काझीरंगाच्या जंगलात...
काझीरंगाच्या जंगलात.. भाग १
इनोव्हा ब्रह्मपुत्रेवरचा पूल ओलांडून तेजपूरच्या दिशेनी निघाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरसों ची पिवळी धम्मक फुलं दुपारच्या उन्हात अक्षरशः चकाकत होती. दुपारच्या सफारीला जाताना बरोबर काहीतरी खायला असावं म्हणून एका ढाबा-वजा हाटेलात थांबलो. एक उतरला म्हणून लगेच बाकीचे पण उतरले. मग काय हलवाया समोरच्या काचेच्या कपाटात जसे पदार्थ ठेवले असतात ना तसे एकेक पदार्थ टेस्टसाठी म्हणून टेबलवर आले. रोशोगुल्ला, राजभोग, अजून एक तत्सम बंगाली मिठाई, सामोसा, कचोरी.. येतंच होतं एकामागून एक. यातला समोसा फारच अप्रतिम होता. लगोलग दहा-बारा समोसे पार्सल सांगितले. मग तेवढ्यात कोणीतरी चहा मागवला, मग तो पिण्यात वेळ गेला. तरी बरं नामेरीहून व्यवस्थित जेवून निघालो होतो. पण काय आहे ना हे असं बाहेर पडलं कि कधीही, कितीही आणि कुठेही खाऊन पोटाचा उकिरडा करणं सवयीचं झालं आहे. काझीरंगा आता तसं काही फार लांब राहिलं नव्हतं पण रेसोर्टवर जाण्याआधीच वेस्टर्न झोनमधली सफारी करून जायचं होतं. त्यामुळे थोडं वेळेचं भान ठेवून आम्ही वेस्टर्न झोनच्या गेटपाशी येऊन पोचलो. मेन गेटपाशीच 'KAZIRANGA - A WORLD HERITAGE SITE' या फलकानी आमचं स्वागत केलं. इथे नामेरीसारखं विशेष असं कुठल्या पक्ष्याला किंवा प्राण्याला बघण्याचं डोक्यात नव्हतं पण मागच्या खेपेपेक्षा यावेळेला काय काय नवीन दिसणार याची उत्सुकता होतीच आणि झालंही तसंच! आमचा ड्रायव्हर 'बिक्रम' जिप्सी घेऊन तयारच होता. आता इथे हे जरा आपल्याला समजावून घ्यावं लागेल बरं का! इथल्या भाषेप्रमाणे आपला 'व' तो यांचा 'ब'. म्हणजे आता असं होईल कि ' व ' ला म्हणायचं ' ब ' आणि ' ब ' ला ' बॉ '... असो.
तर बिक्रमबरोबर वेस्टर्न झोनच्या पहिल्या सफारीला प्रारंभ झाला. आम्ही आतल्या एका टॉवरच्या दिशेनी निघालो होतो तोच समोरून येणाऱ्या एका गाडीनी बिक्रमला काहीतरी सांगितलं आणि ती गाडी निघून गेली. तोवर आम्ही 'पलाश फिश ईगल' बघण्यात गर्क होतो. बिक्रमनी आम्हाला आवरत घ्यायला सांगितलं, कशासाठी ते काही पठ्ठ्या सांगायला तयार नव्हता. मग आम्हीही फार वेळ न घालवता त्या टॉवरपाशी गेलो. इथे खाली उतरता येत होतं. कोपऱ्यात एक पब्लिक टॉयलेट होतं आणि त्याबाजूला रेलिंग. बिक्रम गाडीतून उतरला आणि म्हणाला, सरजी यन्हां एकदम नजदीक इस टॉयलेट के पिछे एक फिमेल गॉर (आसामी भाषेत गेंडा) अपने बच्चे के साथ आयी हुई है| बस रेलिंग के नजदीक मत जाना| मी त्याला ' कौन नजदीक आयी है' असं विचारणार तेवढ्यात त्या टॉयलेटच्या मागच्या अंगानी एक भलामोठा गेंडा पुढे आला होता. अंतर जेमतेम १०-१५ मीटर. हा केवढा आहेSS असं म्हणायला आ वासणार तेवढ्यात हा समोरचा गेंडा लहान वाटेल असा एक अजून मोठा गेंडा समोर चालत आला. ते दोन्ही गेंडे आमच्याकडेच बघत होते. चेहेऱ्यावर अगदीच मख्ख भाव. वास्तविक मला त्यांना सांगावसं वाटलं कि, आमच्याकडे काय बघताय? उलट तुम्हीच दोघं जंगलात फिरायचं सोडून इथे बाहेरच्या टॉयलेटपाशी आला आहात. पण दुर्दैवानी या गेंड्यांना हे मलमुत्र पिण्याची सवय लागली होती. ते बऱ्याचदा इथे येत असतं. एव्हाना टॉयलेटमधे गेलेल्या लोकांना या बाहेर चालू असलेल्या घटनेची सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे आत गेलेला एक फिरंगी त्याच्याच नादात बाहेर आला. बाहेरचे सगळे स्टॅच्यु म्हटल्यासारखे स्तब्ध. तो फिरंगी जागीच थांबला आणि मान वळवून उभा राहिला. त्याला एका सुरक्षित अंतरापेक्षा जवळ पाहिल्यावर तो बेबी गेंडा एकच मिनिट बावचळला आणि नाकातून एक निषेध केल्यासारखा आवाज काढत झाडीत निघून गेला. त्यापाठोपाठ त्याची आई पण निघून गेली. माझ्या दृष्टीनं गेंड्याच्या कुठल्याही स्थितीला बेबी म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखंच आहे. गेंडा... अहो काय अजब प्राणी आहे हा! याला पाहिलं कि मला असं वाटत कि प्रागैतिहासिक काळातला हा प्राणी चुकून या कलियुगात राहिला आहे कि काय! अंगावर चिलखती कातडी पांघरलेलं हे एक अजस्त्र जनावर सदैव चरत असतं. १००% शाकाहारी. त्याच्या मनात आलं तर मान वर करून बघेल नाहीतर नाहीच. राग कायम नाकाच्या शेंड्यावर (वास्तविक शिंगावर म्हणायला हवं ). त्याच्या अजस्त्र देहापुढे त्याचे कान अगदीच विनोदी वाटतात. कदाचित या रणगाड्यावर बसून सहलीला निघालेले गायबगळे (Cattle Egret) आणि जंगली मैना हुलकावण्यासाठी या कानांचा उपयोग ते करत असावेत. हे कान त्यांच्या चिलखती कातडीवर आपटले कि त्याचा चट्-चट् असा आवाज होतो. गेंडे रवंथ करत पुढे जात असताना हे गायबगळे किंवा कधीकधी एखादा धोबी पक्षी (Citrine Wagtail) इतके त्याच्या पायात पायात येतात कि बघणाऱ्याला वाटतं कि कुठल्याही क्षणी हे गेंडे त्यांचा स्टीकर करतील. पण त्याचं सिंक्रोनायझेशन इतकं परफेक्ट असतं कि अशी नामुष्की कधीच येत नाही. उलट गेंडे गवत खात असताना त्यातून बाहेर पडणारे किडे हे पक्षी वरच्यावर उडवतात. याची परतफेड म्हणून हे बगळे त्यांच्या अंगावर बसून त्यावर बसणाऱ्या माश्या किंवा इतर कीटकांपासून त्यांची सुटका करतात. गेंडे तरी आपले कान कितीवेळा आणि कुठवर हलवत बसणार?
या वेस्टर्न झोनमध्ये खरंतर वाघाचं दर्शन बऱ्याचदा घडतं. दोन वर्षापूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा रस्त्याच्या अगदी जवळ काही फुटांवर पण उंच वाढलेल्या हत्तीगवतात तीन वेळा डरकाळ्या ऐकल्या होत्या. पण काय आहे ना व्याघ्रदर्शन रानात नाही तर नशिबात असावं लागतं. त्याशिवाय काही खरं नाही बघा. आम्ही सुद्धा दिवस मावळतीला लागल्यावर हि मांजर प्रजाती कुठे दिसते का बघत होतो पण व्यर्थ. एकतर इथे साडेचारपासूनच सूर्य मावळायला लागतो आणि साधारण सव्वापाचच्या सुमारास अंधार पडतो. त्यामुळे दुपारची सफारी त्यामानानी लवकर संपते. मग काय अडीच वाजता सॅकमधे कोंबलेली जॅकेट्स अंगावर चढवली आणि साहजिकच चहाची तल्लफ आली. चहा पिण्यासाठी म्हणून रस्त्यालगतच्या एका ढाब्यावर आमची गाडी थांबली. गरमागरम चहाचा कप हातात आला. बरोबर आणलेले समोसे आत्तापर्यंत थंड झाले होते. त्यातलाच प्रत्येकानी एकेक उचलला आणि गरम चहाबरोबर पोटात स्थिरावला. चाय पे चर्चा चालू झाली आणि ती होती उद्याच्या इस्टर्न आणि सेन्ट्रल झोनच्या सफारीची...
क्रमशः

Reviewed by Amol
on
December 14, 2019
Rating: 5