लाकडाच्या मोळ्या
संध्याकाळची साडे सहाची वेळ. आम्ही night safari ला निघालो
होतो सातपुड्याच्या जंगलात. हरीलालनी सांगितल्या प्रमाणे सेहरा गावात आलो
entry करायला. हे गाव buffer ला लागूनच असल्याने इथे बिबट्या सुद्धा कधी
कधी दर्शन देऊन जातो. सूर्यास्त अजून झाला नव्हता. त्यामुळे बऱ्यापैकी उजेड
होता. मोकळ्या जागेत कोंबडे उगीचच नाचत होते पंख पसरून. छान टुमदार कौलारू
घरं होती आजूबाजूला. शेजारी चिंचेचं डेरेदार झाड होतं. त्याच्या खाली एका
पेट्रोलिंग कॅम्प जवळ काही मुले खेळत होती. या मुलांकडे भलतीच creativity
असते बरं का! आपल्या लहान पणाचे काही खेळ इथे पाहायला मिळतात. उदा. गाडीचा
tyre घेऊन त्यावर काठी बडवत तो पुढे ढकलत न्यायचा आणि त्यापाठोपाठ किमान
3-4 मुलं अजून. काही मुलं गलोल खेळत असतात. त्याचा उपयोग कधीकधी छोट्या
पक्ष्यांची शिकार करायला पण केला जातो. काही ठिकाणी लगोरी पण खेळली जाते.
खूप बरं वाटत या पोरांना मैदानी खेळ खेळताना. कारण हल्ली शहरात सगळे मैदानी
खेळ हे tab वर खेळले जातात. तिथे एक एकटाच मुलगा काहीतरी करताना दिसला.
त्याच्या हातात अल्युमिनियम चा एक रॉड होता. त्यात त्यानी लाकडाचा एक तुकडा
अडकवून तो फिरता राहील असा ठेवला होता. तो तुकडा बोटानी फिरवत फिरवत तो
त्याचा जीव रमवत होता. प्रत्येक जंगलाजवळच्या अशा गावांमध्ये आपल्या सारखी
माणसं गेली ना की ही सगळी गावातली जनता टक लावून आपल्याकडे पाहात असते. आपण
आतले प्राणी जसे टक लावून बघतो ना अगदी तसेच.. आत्ता तर आम्ही entry
करण्यासाठी थांबलोच होतो त्यामुळे सगळेजण आमचं व्यवस्थित निरीक्षण करत
होते. आजचा तरुण वर्ग सोडला तर बाकीच्या सगळ्यांच्या तोंडावर अचंबा होता.
हे सगळं चालले असताना माझे लक्ष वेगळ्या ठिकाणी लागले होते. पेट्रोलिंग
कॅम्प जवळ दोन लहान मुली जमिनीवर बसून वाळलेली लाकडं, काटक्या गोळा करीत
होती. बहुतेक लाकडं गोळा करून झाली होती. आता त्या नीट एकावर एक रचून
बांधण्याचा घाट घातला होता. लहान अल्लड मुली त्यांना काही केल्या ती गाठ
मारायला जमेना. एकावेळेला एकच मोळी करायचं ठरवलं. एक मुलगी ती रास धरून
ठेवत होती आणि दुसरी गाठ बांधत होती. पण ती गाठ काही नीट बसेना. त्या दोघी
ते खूप enjoy करत होत्या. गाठ निघाली की इतक्या गोड हसायच्या की बास.. मला
ते सारे क्षण कॅमेराबद्ध केले. इतकं निरागस हास्य अशा ठिकाणीच बघायला
मिळतं. अखेरीस बऱ्याच प्रयासाने त्यांना ती गाठ मारण्यात यश मिळालं आणि आता
ती मोळी डोक्यावर घ्यायची होती. मोळी फार जड नसावी तर पण त्या लहानग्यांना
ती जडच वाटली असावी. त्यामुळे ती सरळ सरळ न उचलता खाली डोके घालून आणि
मोळी एका बाजूनं वर करून ती त्यांनी बरोबर डोक्यावर घेतली आणि ' जमलं बाबा
आपल्याला हे ' असे भाव आणून परत हसायला लागल्या. त्यांना बहुतेक कळलं होतं
की मी त्यांचे फोटो काढतोय, म्हणून माझ्याकडे बघून हसतच त्या त्यांच्या
मार्गाला गेल्या. आमची दुसरी gypsy पण एव्हाना आली होती. त्यांना मध्ये
idea network मिळालं म्हणून घरी खुशाली कळवण्यासाठी थांबले होते. आत जायला
निघणार तोच दोन छोटे मित्र हातात आंबा घेऊन आम्हाला अच्छा करायला उभे होते.
बहुतेक बहीण भाऊ असावेत. त्यांनी bye bye केल्यावर मग त्या रोडवर असलेल्या
सर्व मुलांनी आम्हाला अच्छा केलं. विचार आला किती सुखी वाटतात ही लोकं.
किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होतो यांना. बरंय नाही का यांच्या
आयुष्यात अजून तरी facebook, you tube, whatsapp नाहीये ते. नाहीतर अशा
निखळ आनंदाला आपण कायमच मुकलो असतो.