Drivers of MP
तुम्ही म्हणालं title तर अगदी झोकात english मध्ये लिहिलंय आणि लेख तर मराठीतच आहे. त्याच असं आहे, मी जो विषय लिहायला निवडला आहे तो मला माझ्या खास शैलीत लिहायचाय आणि म्हणून मराठीत! हा लेख पूर्ण वाचल्यावर जंगलात हिंडणारे जे काही माझे शेकडो मित्र आहेत ते सर्वच्या सर्व माझ्याशी सहमत होतील यात शंका नाही. Drivers of MP हे काही साधं सुध प्रकरण नाही. हे शीर्षक खरंतर kings of wassepur किंवा guns of navarone यासारखं अभिमानानं घेण्यासारखं आहे. मोडेन पण वाकणार नाही या म्हणीला साजेसं driving करतात. जो कोणी त्यांच्या वाटेत येईल त्यांची खैर नाही. बरं हे चालवतात डावीकडूनच पण इतक्या उजवीकडे जातात चालवता चालवता की जसं काही हा इतकी वर्षे अमेरिकेत left hand drive गाडी चालवत होता आणि आता भारतात त्याला ते जमत नाहीये. बरं हे झालं आपण ज्याच्या गाडीत बसलोय त्याचं, समोरून येणाऱ्या गाडीचा तोच प्रकार. म्हणजे आत बसलेली माणसं कायम गॅस वर. आत्ता धडकवतो का नंतर याचाच विचार करण्यातच आपला वेळ जातो. त्याच्या समोर एकाच ध्येय असतं गिऱ्हाईकाला पोचवायचं.. कुठे ते त्यालाच माहीत. यांना ना कधी काही खायला लागत ना थांबायला. "हो गया सर? निकलें?" असं म्हणून तोंडात मावा, जर्दा, मणिकचंद किंवा पान अशानी तोबरा भरला की चालले लोकांची धडकी भरवायला. आपली आणि इतर रस्त्यावरच्या लोकांची पण. नंतर अधून मधून चालू गाडीतून दार उघडून एखाडी कचकून पिंक टाकून ते रस्ता रंगवण्याच उत्तम काम करतात. पण तेव्हा steering वरची पकड कधीही ढिली पडत नाही. सवय हो सवय.. दुसरं काय? इथे चालवणारेच नव्हे तर पादचारी लोकही कमाल आहेत. यांना एकतर कळतं नाही की कुठुन चालावं. एकमेकांशी बोलताना किंवा समोरच्या माणसाशी बोलताना direct रस्ता ओलांडायला लागायचं. म्हणजे चालकाला वाटलं पाहिजे की आपणच चुकून याच्या समोर आलो की काय?? मग तो पादचारीच पहिला शिव्या घालायला सुरुवात करणार. मग आपला driver ही पेटून उठतो. पण फार काही हमरी तुमरी वर न येता प्रकरण लवकर संपत आणि दोघेही मार्गस्थ होतात. बहुतेक दोघांनाही माहीत असतं की आपण दोघेही त्याच लायकीचे आहोत. त्यामुळे फार वाद होत नाहीत.
आता जंगल सफारी मधले ड्रायव्हर्स.. यांच्या अंगी तर कुठलीतरी दैवी शक्ती असावी. एकतर जंगली वाटा, त्यातून चढ-उतार, नागमोडी वळणं त्यातून मध्ये कुठलाही प्राणी येऊ शकतो ते वेगळंच. या सर्व परिस्थिती मधून तो चालक जर sighting होत असेल तर consistent 45 ते 50 च्या वेगानी gypsy चालवू शकतो. आपल्याला फक्त स्वतः ला सांभाळायचं असतं. आपण फक्त त्याच्यावर विसंबून राहायचं. अर्थात त्याला पर्यायच नसतो. पण एका गोष्टीची मात्र प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे आणि ती म्हणजे नम्रता. महाराष्ट्रातल्या लोकांनी ती त्यांच्याकडून मिळते का बघायला हरकत नाही. हा फरक मला प्रामुख्याने जाणवला. एक गोष्ट सांगतो. पेंच mp मध्ये आम्ही मित्र मित्र सफारीला गेलो होतो. सकाळची सफारी झाल्यावर आम्ही breakfast ला गेलो. गप्पांना रंग चढला होता. नाश्ता चालूच होता आणि अचानक काही लोकांनी तोंडाला येईल ते खायला मागायला सुरुवात केली. आधीच त्यांनी पोहे आणि sandwich दिलं होतं. आमच्या समोर त्यांचा एक माणूस अदबीने खाली हात करून उभा होता. आमच्यातला एक- omlette मिलेगा?
लगेच दुसरा- boiled eggs है?
मग तिसरा- छांस मिलेगी?
पाठोपाठ चौथा- मुझे सिर्फ और एक bread butter
यापैकी कुठल्याही ऑर्डर ला त्यानी " सर ये अब नही मिलेगा, kitchen बंद हो चुका है, आज bread मिला ही नही किंवा मुर्गिने अंडेही नही दिये " अशा कुठल्याही फालतू सबबी न देता तो प्रत्येक ऑर्डर ला " हा साब मिलेगा ना " (copy paste to all orders) असं म्हणत होता. जसं काही त्याच्याकडे फावल्या वेळात अन्नपूर्णा कामाला येते. याच्या बरोबर विरुद्ध अनुभव ताडोबा मोहरलीचा. अशीच नाश्त्याची वेळ. ठराविक मेनू होता. मी omelette खात होतो आणि मला एक bread कमी पडत होता. मी जाऊन पाहिलं तर buffet मधले संपले होते. म्हणून मी request केली तर त्यानी मला जो काही look दिलाय. त्याच्या तोंडावरून मी त्याच्या मनातले भाव जसेच्या तसे ओळखले. तो म्हणाला असेल " च्यायला.. काय खातायंत ही माणसं. आधी तीन bread खाऊन झालेत ना.. आता परत अजून एक हवाय? नंतर परत चहा हवा असेलच. त्यातून दोन तासांनी जेवण आहेच." त्याचा चेहरा पाहून bread मिळाला नसता तरी चाललं असतं. असो.. नम्रतेचा विषय निघाला म्हणून मी ड्राइवर वरून थोडं विषयांतर केलं. चालकही नम्र असतात पण त्यांना नम्रता दाखवायला वेळच मिळत नाही कारण ते रस्त्यावर गाडी नामक शस्त्र चालवत असतात. मला कायम वाटतं की केवळ एका english भाषेमुळे यातले अनेक ड्रायव्हर्स michael schumacher होण्यापासून वंचित राहिले आहेत.
*साल्ला खडूस* या सिनेमातल्या सारखा एक dialogue मलाही टाकावासा वाटतोय. Original dialogue असा आहे " इंडिया से politics हटा कर देखो हर गलीमें champions मिलेंगे. " तसचं मला म्हणायचंय " इन चालको की जिंदगीसे इंग्लिश हटा कर देखो हर tiger reserve मैं schumacher मिलेंगे"