गिधाडे भाग २
दुसऱ्या दिवसाची तशीच टळटळीत दुपार. काही अंदाज येत नव्हता. त्या गिधाडांच्या हाकेला प्रतिसाद येईल की नाही. काही पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे जमिनीवर बसली होती तर अजूनही काही हवेत होती. पण ज्याची ते वाट बघत होते ते त्याची काही चिन्हे दिसत नव्हती. काही वेळातच त्यांच्या हालचालीमध्ये बदल होतोय असं वाटायला लागलं. जमिनीवर जी होती ती जरा दूर झाली आणि हवेतली लांबवर का होईना पण उतरू लागली. आम्ही डोळ्याला दुर्बीण लावली आणि तब्बल दोन दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज आकाशात दोन लाल डोक्याची गिधाडे दिसू लागली. पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडांना जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आम्हाला झाला होता. अखेर आमच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला होता.
हळूहळू जमीन आणि लाल डोक्याच्या गिधाडांमधलं अंतर कमी होऊ लागलं. टप्पात येताच ते घिरट्या घालू लागलं. जणू काही ते अंदाज घेत होतं. सर्व निरीक्षण केल्यावर मग ती दोन गिधाडं शवांपासून काही अंतरावर उतरली आणि अक्षरशः राजाच्या थाटात चालू लागली. त्यांच्या पंखांचा विस्तार एवढा मोठा होता की खाली उतरताना त्यांचा आवाज आम्हाला ऐकू आला. आसपासची वाळलेली पाने, थोड्या प्रमाणात धूळ पण उडली. एव्हाना बाकीची गिधाडे पण जवळ येऊ लागली होती. लाल गिधाडाने मेलेल्या गाईच्या पोटाच्या जवळची नाजूक कातडी चोचीत पकडली आणि बरोबर विरुद्ध बाजूस जाऊन खेचायला सुरुवात केली. दोन दिवस झाले होते त्या शवांना पडून. त्याचं विघटन सुरूच झालेलं होतं. त्यामुळे कातडी खेचल्यामुळे निर्माण झालेल्या ताणामुळे गपकन कोथळा बाहेर आला आणि खालच्या मातीत घरंगळला. तो बाहेर आल्याबरोबर त्यातल्या त्यात जवळ असलेल्या दुसऱ्या गिधाडाने त्याकडे झेप घेतली. तोच त्या लाल गिधाडाने त्यावर हल्ला चढवला आणि त्याला बाजू केले. पण कातडी फाटली हे पाहिल्यावर बाकीच्यांचा पण आता धीर सुटला आणि आसपास असलेली सर्व गिधाडे सरसावली पण जरा जपूनच. कारण अजून राजाचे पोट भरायचे होते. पण त्यांचा संयम जणू आता संपला होता. त्यातली काही मोठी गिधाडे राजाला जुमानत नव्हती आणि त्याला तोंड देत होती. त्यांचे चित्कार ऐकवत नव्हते. राजाशी एक गिधाडं झटापट करते आहे हे पाहून त्यातल्या काही अधाशी गिधाडांनी त्या गाईच्या पोटात आपल्या लांब माना खूपसल्या आणि जे येईल ते ओरबाडत होत्या. कोणीही कुणाचे नव्हते. एकमेकांवर पाय देत होते, चोची मारून हाकलत होते, पिसं ओढत होते. मरून पडलेल्या देहाची विटंबना केल्याप्रमाणे भासत होतं. तोपर्यंत काही कावळे पण तिथे आले. ते सुद्धा आपल्या पदरी काही पडतंय का, पाहात होते. मगाशी गाईच्या फुगलेल्या पोटाचा जो डोंब दिसत होता तो आता भुईसपाट झाला होता. फक्त बरगड्या राहिल्या होत्या. तरी सुद्धा काही उशिरा आलेली चुकार गिधाडं त्यात तोंड घालून बसलीच होती. ज्यांचं पोट भरलं होतं ती तिथेच आसपास होती. त्याक्षणी ती इतकी जड झाली होती की कोणी धावून गेलं असतं ना तर त्यांना उडताही आलं नसतं. आत्तापर्यंत बहुतेक सगळं मांस संपलं होतं. अजून पुढचे दोन दिवस तरी कुणीना कुणी प्राणी-पक्षी तिथे येतंच राहणार होते. आता त्यावर ताव मारण्यासारखं काहीही नसलं तरी थोडी कातडी, वाळलेले रक्त आणि गिधाडांच्या हाणामारीत राहिलेले काही तुकडे यांवर जगणारे काही जीव होतेच की. त्यांना नको का त्यांचा वाटा मिळायला.. जीवो जीवस्य जीवनम् दुसरं काय?