दलारचे अनुभव
दलारचे अनुभव:
आपण नेहेमी बोलताना उल्लेख करतो कि जग किती जवळ आलंय. एखादी नवीन जागा शोधली आणि तिथे जायचं ठरवलं कि आपण लगेच cleartrip/ make my trip वरून त्याजवळ कुठलं airport आहे ते चेक करतो. तिथपर्यंत आपण पोचलो कि बस किंवा तत्सम गोष्टीच्या आपण भानगडीत न पडता एखाद्या खाजगी वाहनानी आपण आपल्या favorite destination ला हाहा म्हणता पोचतो. पैशाचं पाठबळ असलं कि सगळं सोपं वाटत, नाही का? पण तुम्ही कल्पना करून बघा एखादं खूप छोटं गाव.. खरंतर गाव म्हणणं पण चुकीचं ठरेल, एक अशी मानवी वस्ती जिथे ना शेजार ना शाळा ना दुकानं ना धड रस्ता ना मुलांना खेळायला मैदान. येतंय का असं काही डोळ्यासमोर? नाहीच येणार कदाचित.. अशा या उत्तराखंड राज्यातल्या अल्मोरा जिल्ह्यातल्या मानवी वस्तीचं नाव आहे दलार. बिनसर अभयारण्याला लागून हे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आत.. अगदी डोंगराच्या कुशीतच म्हणा ना आणि इथवर यायला कुठलीही गाडी नाही. जी काही आहे ती जंगलातली पायवाट. आपल्या बरोबर जे जे काही सामान असेल ते पाठीवर घेऊनच यावं लागायचं. मग ती bag असो किंवा धान्याचं पोतं. पक्षी बघायला म्हणून हि पायवाट उत्तम आहे. या पायवाटेवरून जाताना अनेक प्रकारचे Woodpecker, Tit, Tree creeper, Flycatcher, Black francolin, Pheasant असे अनेक पक्षी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. पाईनच्या गर्द झाडीतून वर बघितलं तर डोक्यावर Himalayan griffon, Mountain hawk eagle, Red-headed vulture टेहळणी करताना दिसत. संध्याकाळी सात नंतर मात्र बाहेर पडायला बंदी कारण अस्वलं आणि बिबट्या कधी तुमच्या वाटेत येईल याचा अंदाज लावणं कठीण. इथे रानडुकरही बऱ्याच प्रमाणात आहेत आणि बऱ्यापैकी शेतीची नासधूस करतात.
अशा या वस्तीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या केवल आणि संतोष जोशी कुटुंबाकडे आमचा मुक्काम होता. त्यांच्या राहत्या घरापासून जवळच एक मजला असलेली छोटीशी बंगली बांधली होती. एक खोली, त्याला लागून एक किचन आणि एक स्वच्छता गृह. असं मोजकंचं पण आटोपशीर. खोलीच दार उघडून बाहेर गेलं कि बसायला छान कट्टा. सभोवार फक्त पाईन आणि ऱ्होडो डेंडरॉन (बुरांश) ची झाडं. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी कुठल्या ना कुठल्या पक्ष्याची शिळ कानावर पडायचीच. बघू तिथे ऱ्होडोची लाल भडक फुलं फुललेली होती. त्यातला मकरंद मटकवण्यासाठी पक्षी गलका करत होते. जोशी कुटुंबाच्या आसपास शेती आणि फळझाडांची लागवड केलेली होती. अक्रोड, नासपती, मलबेरी, रॉसबेरी अशी फळझाडं आणि लसूण, मेथी, पालक, मटार, पातीचा कांदा, फुलकोबी, कोथिंबीर, मोहोरी टोमेटो, काकडी, मुळा, गहू, तांदूळ इत्यादीची शेती. जे पिकतं ते खायचं. तूरडाळ, उडीदडाळ वगैरे अशा गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन घेऊन यायला लागायच्या. मुलांना शाळेत जाण्यासाठी घरामागचा डोंगर उतरावा लागायचा आणि तोच परत चढून घरी यायला लागायचं. घरच्या एखाद्याला जर काही लागलं किंवा अपघात झाला तरी उपचाराकरता अल्मोरापर्यंत जावं लागायचं. म्हणजे आधी दोन किलोमीटर उंचसखल अंतर पायी तुडवायचं आणि मग एखादी गाडी करून अल्मोराला पोचायचं. तिथे पोचेपर्यंत कुठलेही वैद्यकीय उपचार करताच येत नाहीत. हे सगळं असंच असून सुद्धा कोणाच्याही चेहेऱ्यावर कधीच निरुत्साह किंवा आळस दिसत नाही. जेवायला सकाळी भात, भाजी आणि डाळ-पालक / मेथी, लसणाचं लोणचं आणि सलाड. कधी कधी कढी पण असायची. आणि रात्री पहाडी पराठा, सरसो कि सब्जी/ मटार बटाटा/ दाल असा बेत असायचा. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. संपूर्ण शाकाहार आणि तोही organic. पाणी सुद्धा naturally purified. आमचं जेवण झाल्याशिवाय कुटुंबातलं अन्य कुणीही जेवत नसे. प्रेमानी आणि आग्रह करून जेवायला वाढायचे. आमचं जेवण चालू असताना जर पराठा घ्यायला कुणी नाही म्हणालं तर त्या घरातल्या आजी म्हणायच्या,' एक पराठेसे भला किसका पेट भरता है? डटकर खाओ. दिनभर चिडीयोन्के आगे पीछे घुमते रेहते हो, तो फिर कमसेकम दो पराठे तो खानेही होंगे|' आपली सख्खी आजी ज्या अधिकारानं सांगेल ना अगदी त्याचं अधिकारानं ती आम्हाला खायला भाग पाडत होती. घरातला प्रत्येक माणूस आमची विचारपूस करायचा. मोठे तर विचारायचेच पण तिथली तीन लहान मुलं पण त्यांच्या परिनी चौकशी करायचे. पंकज, वंदना आणि कोमल अशी हि तीन मुलं त्यांच्या परीनी जीव रमवायची.
त्यांची एक गंमत सांगतो. यातला पंकज नावाचा जो मुलगा होता त्याच्याकडे कुठल्याशा दोन badminton च्या racquets होत्या. कुणी दिल्या कुणास ठाऊक. आमच्यातल्या एकानी त्याला सांगितलं कि ' ये अमोल है ना वो badminton अच्छा खेलता है|' झालं पंकजला निमित्तच मिळालं खेळायला आणि तत्परतेनी त्यानी दोन racquets आणल्या. त्यातली एक माझ्या हातात देत म्हणाला,' अमोलदा आज मै आपको आऊट करुंगा|' आता badminton मधे "आऊट होणं" हि concept मला नवीन होती. आम्ही खेळायला लागलो. आश्चर्य म्हणजे त्यानी racquet नी हाणलेलं shuttle मला खेळताच येईना. मी ते हातात घेतलं. खरी गंमत तर shuttle ची होती. पाहिलं तर त्या shuttle चा अक्षरश: frock झाला होता. कसं काय खेळणार होतो मी देवच जाणे. मला ते shuttle पाहून हसूच आलं आणि मी माझ्या हातातली racquet दुसऱ्या एकाच्या हातात सोपवली. मग ते दोघं जण ज्या प्रकारे खेळायला लागले ते पाहून आमची हसून हसून पुरेवाट झाली. badminton, cricket, baseball, football हे सर्व खेळ ते त्या shuttle बरोबर खेळत होते. अशा प्रकारे खेळल्यावर त्याची वाट लागली नसती तरच नवल. दर संध्याकाळी त्याच तिकिटावर त्याच shuttle चा खेळ आम्हाला बघावा लागत होता. वास्तविक त्याला खेळ नव्हे तर हाल हा शब्दच योग्य होता. ना कधी त्यांना त्याचा कंटाळा येत होता ना त्यांची त्याबद्दल तक्रार होती. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहात असायचा. असे एकेक दिवस नवीन नवीन अनुभव घेत जायचा दिवस कधी उजाडला हे कळलंच नाही. आमच्यापैकी एकाचाही पाय निघता निघत नव्हता. कोण होती हि माणसं आमची? पण चार दिवसांत जीव लावला होता त्या कुटुंबानी. नक्की काय भावलं मनाला हेच कळत नव्हतं आम्हाला.. इथली हिमाच्छादित शिखर आवडली कि लपाछपी करत इकडे तिकडे नाचणारे पक्षी आवडले? भाभीच्या हाताचा पहाडी पराठा आवडला का उन्हात आल्यावर प्यायलेलं ऱ्होडो डेंडरॉनचं सरबत आवडलं? वंदना, कोमलचे निरागस प्रश्न आवडले कि पंकजचा त्या shuttle बरोबरचा खेळ आवडला? कडाकणी थंडी आवडली कि रात्रीचं जेवण झाल्यावर जाड ब्लँकेट मधे शिरून अनुभवलेली ऊब आवडली? अवघड आहे याचं उत्तर. पण या उत्तराच्या मागे न लागता या सगळ्या मागची ओढ समजून घेता आली ना तरी पुष्कळ आहे.