सुंदरबन – पूर्वेकडील पाचूचे बेट
सुंदरबन – पूर्वेकडील पाचूचे बेट
पुण्याहून सकाळी सहाच्या विमानानी आम्ही पावणे नऊच्या सुमारास कोलकाताला पोचलो. आमच्या ग्रुपमधली बाकीची लोकं आधीच दोन दिवस इथे आलेली होती. अर्ध्या पाऊण तासातच आम्हाला गाडी (Tempo Traveller) घ्यायला आली आणि त्यात बसून आम्ही गडखाली (इथे याला godkholi असं म्हणतात) या गावाच्या दिशेनी निघालो. अंतर आहे फक्त १०० km चं पण तरी पोचायला आम्हाला साडे तीन तास लागले. रस्ता त्यामानानी खूपच अरुंद आणि रहदारी खूप, त्यातून तिथल्या स्थानिक लोकांनी रस्त्यावरच काढलेल्या मोटार गॅरेजेसमुळे मार्ग काढतच जावं लागतं. गडखालीला जाताना दोन्ही बाजूनी फक्त शेत दिसत होती. कोंबडी आणि बदकं जागोजागी दिसत. बदकं एकूणच जास्त होती. किमान चारच्या संख्येनी नाला किंवा शेतात सारखी चोच खुपसून बसलेली असायची. मोकाट कुत्र्यांचा वावर बराच होता. Packed breakfast घेतला होता त्यामुळे कुठेही न थांबता आम्ही सरळ गडखालीला पोचलो.
गडखालीला पोचल्यावर WELCOME TO THE ONLY MANGROVE TIGER LAND IN THE WORLD या पाटीनी आमचं स्वागत केलं आणि तिथून आम्ही आत जेट्टीच्या दिशेनी निघालो. हा भाग खूप गजबजलेला होता. अनेक हमाल सामानाची ने-आण करत होते. त्यात काही जण आमच्या बॅग्स घेऊन आमच्याच बरोबर निघाले होते. एक जिना उतरताच पायी रस्ता संपला. पुढे अनेक बोटी लागल्या होत्या. त्यातल्याच एका बोटीत आम्ही सगळे शिरलो. आत जाताच परत दोन जिने दिसले. एक खाली जात होता, तिथे चार मोठे पलंग होते आणि त्यापलीकडे किचन. आणि दुसरा जिना वरच्या डेकवर जात होता. तिथे सहा सात खुर्च्या आणि एक बैठं टेबल होतं. पलीकडे एक dining table आणि एक बाक होता. त्यावर आमचं दुपारचं जेवण तयारच होतं. लगेचच आम्ही जेवायला मागच्या बाजूला गेलो. तिथे बुफे मांडला होता. दोन प्रकारची कोलंबी, व्हेज भाजी, पांढरा भात, दाल, लोणचं, सलाड, पापड आणि स्वीटडिश असा व्यवस्थित मेनू तयार ठेवला होता. मग काय विचारता नाश्ता करून बराच वेळ झाला होता त्यामुळे सर्वांनी त्यावर आडवा ताव मारला. प्रत्येक पदार्थाला अप्रतिम चव होती. चालत्या बोटीत गार वाऱ्यावर आम्ही उत्तम जेवणाचा आस्वाद घेत होतो. आमची बोट sajnekhali ecotourism complex च्या दिशेनी चालली होती. इथे आम्हाला आमच्या पुढच्या तीन दिवसाचं परमिट काढायचं होतं. गुमडी, बिंद्याधारी अशा नद्या पार करत आम्ही दुर्गादुनी नावाच्या भागात जात होतो. दुर्गादुनी म्हणजे सुंदरबनच्या मुख्य जंगलाच्या बाहेरचं जंगल. इथे बरेच पक्षी दिसायला लागले होते. मिळतील तसे फोटो काढत काढत आम्ही सजनेखालीला येऊन पोचलो. परमिट मिळताच आम्ही आमच्या रेसोर्टकडे निघालो. संध्याकाळचे पाच वाजले होते पण काळोख खूप पसरला होता. हा हा म्हणता सहा वाजता पूर्ण अंधार झाला. Riverside Holiday Resort मधे आम्ही उतरलो होतो. दमणूक अशी काहीच झाली नव्हती. रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि सातला चहा घेऊन तिथेच गप्पा मारत बसलो. रात्री आठला जेवण येणार होतं. मग तिथेच आसपास जरा हिंडून पाय मोकळे करून आठला जेवण करूनच रूमवर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे पाचला सफारीला जायचं होतं.
सकाळी तशी थंडी फार नव्हती पण बोटीत बसल्यावर गार वारा यायला लागला आणि बॅग मधे असलेले sweaters, thermals आणि pullovers भराभर बाहेर निघाले. आठ वाजले तरी सूर्याचा पत्ता नव्हता. पावसाळी हवा नव्हती पण कडक ऊन पण नव्हतं. समोरचं सगळं दृश्य स्वप्नवत होतं. कधीही न अनुभवलेलं. पीरखाली मधून आम्ही मुख्य जंगलात प्रवेश केला. दोन्ही बाजूनी गर्द दाटीतलं mangrove जंगल गूढ वाटत होतं. एकूण १०२ बेटांचा हा प्रदेश. यातली ४८ बेट हि घनदाट जंगलांनी तर ५४ बेट ग्रामीण वस्त्यांनी व्यापलेली आहेत. इथे पर्यटकांसाठी केलेल्या रेसोर्टच्या आसपास सुद्धा जाळ्या घातल्या आहेत. कारण वाघ सलग पाच ते सहा किलोमीटर पोहून दुसऱ्या बेटावर जाऊ शकतो. इथल्या मानवी वस्तीत बऱ्याचदा वाघानी धुमाकूळ घातला आहे. मासेमारी आणि शेती हा इथला प्रमुख व्यवसाय. त्याच बरोबरीन इथला एक गट जंगलात जाऊन मध गोळा करतो. त्यामुळे इथे मध बऱ्याच प्रमाणावर खाल्ला जातो आणि विक्रीसाठी पण ठेवला जातो. या mangrove जंगलांमध्ये अनेक प्रकारची झाडं आहेत ज्यांची विस्तृत यादी होईल. अशी निरनिराळ्या प्रकारची माहिती साठवत आणि सुन्धाखाली, साराखाली, सुंदरखाली, चोरगाझी, दोबंकी, खोनाखाली अशी एकापाठोपाठ एक ठिकाणं मागे टाकत आणि पक्षी पाहात पुढे जात होतो.
बोटीवरच्या लोकांनी आमची चांगलीच बडदास्त ठेवली होती. शॉतदल नावाचा एक कुक बोटीवर होता. सकाळी चहा, नंतर नाश्ता मग तासा दीड तासात lemon tea, दुपारी दीडच्या सुमारास जेवण, दुपारी चहा / कॉफी आणि संध्याकाळी snacks असा आस्वाद घेत घेत photography चालू होती. लंचची वेळ जवळ आली होती आणि किचन मधून वेगवेगळे वास नाकात जात होते आणि तेवढ्यात आतून शॉतदलची हाक आली, ' सर लंच लगा दिया है, गरमा गरम खा लीजिये.' या माणसानी सतत काही ना काहीतरी खायला देऊन आमचे वजन वाढवले होते. बऱ्याचदा प्लेट हातात असताना बाहेर झाडावर काहीतरी दिसायचं कि प्लेट खाली ठेवून कॅमेरा हातात घ्यायला लागायचा.
सकाळी ६ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आम्हाला बऱ्यापैकी पक्षी दिसले. उदा. सहा प्रकारचे kingfishers, peregrine falcon, buffy fish owl, osprey, red junglefowl, brahminy kite, serpent eagle. काही ठिकाणी ताजे वाघाचे पंजे पण दिसले. पण बहुतेक आम्हाला काही मिनिटांचा उशीर झाला असावा. त्यामुळे व्याघ्रदर्शन काही झाले नाही. एव्हाना पावसाची एक सर येऊन गेली होती. जंगलातल्या थंड तापमानामुळे वाळूवर एक मगर निवांत पडलेली आम्हाला दिसली. आमची बोट जवळ येताच ती अजून थोडी पुढे सरकली. ती पुढे सरकताना तिच्या अवजड असण्याचा चांगलाच अंदाज येत होता. तिथे अधिक वेळ न दवडता आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. हळू हळू पडत असलेला काळोख दिवस संपत आल्याची जाणीव करून देत होता. उद्याचा अख्खा दिवस आणि परवाचा अर्धा दिवस आमच्या हातात होता. या पुढच्या दीड दिवसांत hi tide low tide च्या बदलामुळे अनेक नवीन species आम्हाला दिसल्या होत्या. बोटीवर घालवलेले ते तास, पावसाचं पाणी सांभाळत उभं राहून खुर्चीवर वाकडंतिकडं बसून झोपून केलेली फोटोग्राफी, बोटीच्या टोकाला बसून थंडगार वारा अंगावर घेत प्यायलेला चहा आणि भजी, बोटीवर झालेलं आदरातिथ्य त्याबरोबरच ऊन, वारा आणि पाऊस यांनी आमची घेतलेली फिरकी या सगळ्याच गोष्टी मनाला आनंद देऊन गेल्या. आमचा तिथला मुक्काम संपला होता. निघण्याची वेळ जवळ आली. हे सगळं परत अनुभवायला यायला लागणारचं होतं पण आता पुण्यात गेल्यावर खरी रुखरुख लागणार होती ती "सर लंच लगा दिया है" या शॉतदलच्या हाकेची.