संजय डूबरी

संजय डूबरी - प्राणी हरवलेलं समृद्ध जंगल.... संजय डूबरी टायगर रिझर्व SDTR ( मध्य प्रदेश छत्तिसगढ बॉर्डर ) सीधी आणि सिंगरौली जिल्हा. क्षेत्रफळ 1462 Sq km

जायचं नक्की झाल्यावर जेव्हा लोकांना सांगितलं तेव्हा बहुतेक प्रत्येक माणसानी “ कुठे? “ असा प्रश्न आवर्जून विचारला. कारण Google map वर पण ते लगेच सापडत नाही. मध्य प्रदेशातल्या प्रमुख ६ टायगर रिझर्व पैकी एक. MP आणि CG अशा दोन राज्यांत हे जंगल आहे. त्यात MP मधे संजय डूबरी टायगर रिझर्व आणि CG मधे गुरु घासिदास वाईल्ड लाईफ सेंच्युरी असे दोन भाग पडतात. तर असं हे SDTR चार भागात पसरलेलं आहे. डूबरी, कुसमी, पोंडी आणि बस्तुआ अशा चार ranges आहेत. कुसमी, पोंडी हि दोन gates फारच लांब आहेत. संपूर्ण जंगलामध्ये अस्वले मोठ्या प्रमाणावर आहेत. वाघांची संख्या सध्या तरी ११ ते १५ च्या आसपासच आहे. त्यामुळे sighting क्वचितच होते. पण तिथले गाईड सांगतात कि मार्च/ एप्रिल मध्ये आम्ही पैजेवर किमान ५ तरी अस्वले दाखवूच. इथे grassland, dense forest, rocky patches, river, meadows हे सर्व प्रकार पाहायला मिळतात. इथे वन्यजीवन कमी प्रमाणात असण्याचं प्रमुख कारण म्हणजे dubri core zone मध्ये असलेली ४२ गावं. आपण जंगलामध्ये फिरत असताना अचानक समोर गाईगुरे, शेळ्यामेंढ्या आणि मेंढपाळ असे फिरताना दिसतात. त्यामुळे हि सर्व गावे जोपर्यंत हटवत नाहीत तोपर्यंत तरी इथे वन्यजीवन वाढणार नाही. जंगलामध्ये अनेक चांगले SPOTS आहेत. उदा. गिद्ध पहाड, बिटकुरी TOWER...
SDTR मध्ये राहण्याची MP TOURISM ची उत्तम सोय आहे. बाकी अन्यत्र सोय नाही. PARSILI RESORT मध्ये सर्व सुखसोयी तर आहेतच पण परिसरहि भुरळ घालणारा आहे. कुठलेही MOBILE NETWORK नसल्याने मात्र कधीकधी अडचण भासते. पण जंगलातल्या सर्व TOWERS वर मात्र NETWORK आहे. मागे बनस नदी आहे. त्याच्या आसपास आपल्याला WALKING TRAIL घेता येतो. या TRAIL वर बर्यापैकी BIRDING होतं. उत्साही मंडळीना नदी पार करून समोरच्या तीरावर पण जाता येते. सर्व STAFF अतिशय नम्र आहे अर्थात हे MP असल्यामुळे हे सांगायला नकोच.
जंगलाच्या समृद्धतेविषयी बोलायचं झालं तर ते अनेक देशी झाडांनी युक्त आहे. पाण्याची कमतरता अजिबात नाही. इथे वन्यजीवन खूप बहरू शकतं पण मानवी हस्तक्षेप खूप आहे. आपण core zone मध्ये फिरतो आहोत असं वाटतानाच अचानक समोर गाव येतं. जंगलामध्ये संपन्नता असून वन्य जीवांना कुठेतरी असुरक्षित वाटत असणारंच कि. आपल्यालाही फिरत असताना जंगलाच्या अधे मध्ये प्राणी हरवल्यासारखे वाटतात, तसेच अचानक समोरही येतात.
सलग १४ तास जंगलामध्ये...
पहिल्या दिवशी सकाळ संध्याकाळ सफारी घेतल्यावर आम्ही FULL DAY SAFARI चा निर्णय घेतला. आमच्या बरोबर सुभाषसिंग म्हणून तिथला सर्वात अनुभवी गाईड होता तो म्हणाला “ खानेको कुछ भी साथ लेनेकी जरुरत नही, हम रास्ते में खा लेंगे. चिंता मत करो. “ म्हणून फक्त पाण्याच्या बाटल्या बरोबर घेतल्या आणि सकाळी ६ ला आम्ही निघालो. रात्री ठरवल्याप्रमाणे आम्हाला पूर्ण दिवसांत बस्तुआ आणि पोंडी या दोनहि GATES ला जायचे होते. सकाळी बर्यापैकी थंडी होती. पारसिली मधून बाहेर पडून आम्ही मझौली मार्गे बस्तुआ RANGE ला गेलो. रस्तात आम्हाला बरचसं BIRDING झालं. एकंदर गवताळ कुरणं आणि सालचं जंगल यांचं उत्तम उदाहरण होतं हे. साग, साल, महुआ, आंबा, पिंपळ, वड, पळस, करू (GHOST TREE), अर्जुन अशी बरीच झाडे दिसली. प्रामुख्यानी साग, साल आणि महुआ. इथे आम्हाला DUSKY EAGLE OWL चे बरेच CALLS आले. पण अनेक प्रयत्न करूनही त्याचे दर्शन मात्र नाही झाले. फार थांबून चालणार नव्हतं कारण अजून बरच पुढे जायचं होतं. वाटेत सुभाषसिंगनी डाळ, तांदूळ, बटाटे आणि लौकी (दुधी भोपळा) अशी सामुग्री घेतली आणि म्हणाला “ चलो आज आपको दाल चावल और आलू कि सब्जी खिलता हुं ” दुधी भोपळा त्यांनी तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी घेतला होता. हे एका अर्थी बरच झालं. दुधी भोपळा च्या ऐवजी बटाट्याची भाजी कधीही छानचं! तिथेच एका टपरीवर चहा घेतला. उन चांगलंच वर आलं होतं. अशी मजल दरमजल करत, एकेक गावं ओलांडत आणि पोंडी पाशी आलो. इथे आल्यावर त्या लोकांना कळेनाच कि आम्ही नक्की कशासाठी आलो आहोत ते, शेवटी सुभाषसिंगनी त्यांना पाउण तास सर्व समजावून सांगितल्यावर त्यांनी आम्हाला आत जायची परवानगी दिली आणि आम्ही एकदाचे CORE ZONE मध्ये आलो. आत आत गेल्यावर आम्हाला अस्वलांच्या अनेक गुहा दिसल्या. खूप पक्षी दिसले. उन खूपच डोक्यावर आल्यावर आम्ही तिथल्या FOREST REST HOUSE पाशी आलो. तिथे आम्ही साधारण तासभर होतो. तिथेच त्यांनी आम्हाला परातभर दाल भात आणि बटाट्याची भाजी खाऊ घातली. इतके पोटभर जेवल्यावर झोप यायला लागली होती. पण न झोपता आम्ही बाहेर पडलो. त्यांनतर आम्ही अजून २ GATES हिंडलो. हळूहळू उन कमी होऊन संध्याकाळ होऊ लागली. घडयाळ पाहिलं तेव्हा लक्षात आलं कि आपण १२ तासांपेक्षा जास्त वेळ जंगलामध्येच हिंडतोय. ६ वाजताच गडद अंधार पडायचा इथे. परतीची एकेक GATES पार पाडत आणि मुख्य GATE पाशी आलो. तिथे जसकाही आभार मानायला यावं त्याप्रमाणे स्थानिक लोक आम्हाला “ अच्छा लगा आप हमारे जंगल में आए. हर कोई आता नही यहां. अगली बार जरूर आना “ असं म्हणू लागली. वाईट वाटले आणि मनात म्हणालो काय परिस्थिती आहे हि एकाच राज्यातल्या दोन वेगळ्या अभयारण्यांची? एकीकडे कान्हा/ बांधवगड पर्यटकांनी ओसंडून वहात असताना संजय डूबरी मध्ये कुणीच येऊ नये. काय हि दुरावस्था? एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते कि इथल्या स्थानिक लोकांना पण त्यांचे ज्ञान वाढवावे लागणार आहे. किती दिवस एकट्या सुभाषसिंग वर अवलंबून राहणार? MP TOURISM ला इथे लक्ष घालावं लागणार आहे, त्याशिवाय FOOT FALL वाढणार नाही. असो.. असे सगळे विचार मनात चालू असताना आम्ही साधारण ८ च्या सुमारास तब्बल १४ तासांनी पारसिली ला परत आलो. शीण आला होता, सर्वजण FRESH झालो. रात्री गप्पा मारत मारत CHEF नी केलेल्या उत्कृष्ट जेवणावर ताव मारला आणि पलंगावर आडवे पडून दिवसभराच्या आठवणी काढत काढत कधी झोप लागली ते कळलंही नाही.
Powered by Blogger.